विजापूरमधील आदर्श नगर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाई केली आहे.

आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि रिकाम्या भूखंडांवर बसून मद्यप्राशन करणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. यासोबतच मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनचालकांची ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ तपासणी करण्यात आली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि दारू पिऊन बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर आगामी काळातही अशीच कडक आणि निरंतर मोहीम सुरू राहील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Recent Comments