Belagavi

बेळगावात माजी सैनिकांच्या महासंघाकडून मोफत रोपवाटप

Share

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगावमध्ये माजी सैनिकांनी देशरक्षणाच्या कर्तव्यासोबतच निसर्गरक्षणाचा एक आदर्श संदेश दिला आहे. जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघ आणि त्यांच्या महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा हरित संकल्प करण्यात आला.

बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघ आणि त्यांच्या महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोफत रोपवाटप आणि पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पूजेरी यांनी भूषवले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिम्स आवारात सुमारे ५० रोपे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जागतिक हवामान बदलाचे संकट दूर करण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय असून, माजी सैनिक संघटना दरवर्षी अशा प्रकारे जनजागृतीचे कार्य करत राहील, असे प्रतिपादन जगदीश पूजेरी यांनी केले.

या प्रसंगी रमेश चौगुला, डॉ. सतीश चौलीगेर, प्रशांत गौराणी, डॉ. अशोककुमार शेट्टी, मनोहर पुडकलकट्टी, नागेश यडाल, सुरेश लक्कण्णावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: