बेळगावमधील सांब्रा एअरमेन प्रशिक्षण शाळेत वायुसेनेच्या अग्निवीरवयू ७ व्या बॅचचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. या समारंभानिमित्त भारतीय हवाई दलाच्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकाने आकाशात विलोभनीय प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.


बेळगावमधील सांब्रा एअरमेन प्रशिक्षण शाळेत २२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या १,२५० अग्निवीरांचा दीक्षांत संचलन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय हवाई दलाचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकाने सादर केलेली प्रात्यक्षिके आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. हेलिकॉप्टरच्या आकाशातील हालचाली आणि शिस्तबद्ध उड्डाणाने हवाई दलाची क्षमता अधोरेखित केली.

देश-विदेशात १,२०० हून अधिक यशस्वी एअर शो सादर करणाऱ्या सारंग पथकाने बेळगावच्या आकाशात आपली कौशल्ये दाखवली. एएचएल निर्मित स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक ‘एएलएच ध्रुव’ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे सादरीकरण करण्यात आले. हवाई दलाचा हा एअर शो आणि शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक तसेच जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments