कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज बेंगळुरूमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या या नूतन प्रदेशाध्यक्षांचे अत्यंत उत्साहात आणि आपुलकीने स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस हायकमांडकडून केपीसीसीच्या नूतन अध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर, बी. के. हरिप्रसाद यांनी बेंगळुरू येथील रेसकोर्स रस्त्यावरील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन सदिच्छा चर्चा केली. या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बी. के. हरिप्रसाद यांचे अभिनंदन केले. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीही नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.



Recent Comments