माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेंगळुरूमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. आपल्या कार्यकाळात मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या वेळी सिद्धरामय्या यांचे आभार मानले.

माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेंगळुरूमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिद्धरामय्या यांनी वंचित, मागास आणि गरिबांचे प्रश्न सोडवून लोकाभिमुख प्रशासन दिले असून त्यांच्या योजना आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी नेहमीच मार्गदर्शक ठरेल, असे मत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याचे भाग्य लाभले, अशा शब्दांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले असून त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या वेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.



Recent Comments