कर्नाटक राजकारणातील घडामोडीत काँग्रेस हायकमांडने ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांची केपीसीसी अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे

डी के शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाची धुरा अब मागासवर्गीय समाजातील एका प्रभावशाली नेत्याकडे सोपवण्यात आली आहे. सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांमध्ये या पदासाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, हायकमांडने पक्षातील ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांच्याकडे केपीसीसी अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या ७१ वर्षीय हरिप्रसाद यांच्यावर आता काँग्रेसने पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली आहे. इडिगा समाजातील प्रमुख नेते असलेल्या हरिप्रसाद यांचे दिल्लीतील वजन आणि मागासवर्गीय घटकांवरील प्रभाव लक्षात घेऊन एआयसीसीने ही अधिकृत घोषणा केली आहे



Recent Comments