कमी कालावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.


बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनधिकृत संस्थांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन केले.नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई केवळ अधिकृत बँकांमध्येच ठेवावी आणि अनधिकृत खाजगी कंपन्यांना पैसे देऊ नयेत, असे बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले आहे. केवळ शासकीय नोंदणीकृत चिटफंड संस्थांनाच ठेवी स्वीकारण्याची कायदेशीर परवानगी असते, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कोणीही २० ते ३० टक्के इतका अवाजवी नफा किंवा पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, अशा प्रकरणांमध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता असते, असे के. रामराजन यांनी म्हटले आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता, कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा; फसवणूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा के. रामराजन यांनी दिला आहे.


Recent Comments