Belagavi

शाळा क्रमांक २७ मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Share

बेळगावमधील छत्रपती शिवाजीनगरमधील शाळा क्रमांक २७ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

१९८१ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक-शिक्षकांची उपस्थिती लाभली होती.

माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त करत सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्कार व स्नेह जपण्याचा सल्ला दिला; तर दुसरीकडे, मराठी शाळांची घटती पटसंख्या पाहता या शाळा टिकवण्यासाठी प्रत्येकाने किमान एका विद्यार्थ्याला मराठी शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, असे आवाहन शिक्षकांनी केले.

सुमारे ४१ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पालकांच्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली; तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ व ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ गाजवणाऱ्या अशोक थोरात यांच्या दोन्ही पुत्रांच्या उल्लेखनीय क्रीडा यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पावले यांनी केले.

Tags: