बेळगाव पोलीस आयुक्तालय क्षेत्रात बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून मटका, जुगार आणि गांजा सेवन प्रकरणी एकूण १० जणांना अटक केली, तर दोन आरोपी पसार झाले आहेत.

खडेबाजार पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि शिवाजी रोडवर मटका घेणाऱ्या विनायक जाधव (वय ४५, रा. भांदुर गल्ली) याला, तर मार्केट पोलिसांनी होसूरमध्ये निखिल घंटाण (वय ३२) याला अटक केली. या वेळी राजू नावाचा आरोपी पसार झाला.

शहापूर पोलिसांनी बळ्ळारी नाल्याजवळील जुगार अड्ड्यांवर छापा टाकून धनराज ऊर्फ बंटू सुतार, नजीर पठाण, श्रीधर लोहार, राहुल हळगेकर, नागप्पा नाईक, विनायक दरमूड आणि विश्वनाथ गोटडकी अशा ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४७,२०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून शशी जालगार हा आरोपी पसार झाला.
टिळकवाडी पोलिसांनी भाग्यनगर येथे संशयास्पद रितीने वावरणाऱ्या सूरज श्याम शानभाग (वय ३५) याला ताब्यात घेतले, वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व पथकांचे कौतुक केले आहे.


Recent Comments