Belagavi

बेळगावमध्ये जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

Share

बेळगावमध्ये विविध शासकीय विभाग आणि भरतेश होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित जनजागृती रॅली आणि पथनाट्याद्वारे तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यात आला.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा सर्वेक्षण पथक, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदोळी आणि भरतेश होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व ळी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी तथा तंबाखू नियंत्रण अधिकारी डॉ. संजय एस. दोड्डमणी यांनी प्रास्ताविक केले.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमधील घातक रसायनांमुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत असल्याने नागरिकांनी याचे सेवन थांबवावे, असे आवाहन डॉ. संजय एस. दोड्डमणी यांनी केले.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ चघळून थुंकणाऱ्यांवर दंडात्मक व कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत डॉ. अरुणकुमार जमदाडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला भरतेश होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत कोकणनी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रसाद हिरेमठ, आरोग्य निरीक्षक संगमनाथ बाळिगट्टी, उपजिल्हा आरोग्य शिक्षण अधिकारी प्रकाश माने, तंबाखू नियंत्रण कक्षाच्या सल्लागार श्वेता पाटील आणि कविता राजन्नवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माने यांनी , तर डॉ. श्वेता पाटील यांनी आभार मानले.

Tags: