मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्षपद देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावमधील प्रसिद्ध हजरत सय्यद मुराद अली शाह दर्ग्यात मुस्लिम बांधव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामूहिक विशेष प्रार्थना केली.

काँग्रेस कार्यकर्त्या आयेशा सनदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाजवळील मुराद अली शाह दर्ग्याला भेट दिली. या वेळी समर्थकांनी दर्ग्यात फुलांची चादर अर्पण करून सतीश जारकीहोळी यांना उच्च पदे मिळावीत यासाठी प्रार्थना केली.

या वेळी काँग्रेस कार्यकर्त्या आयेशा सनदी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. डी. के. शिवकुमार यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून जसे पद मागितले आहे, तसेच सतीश जारकीहोळी यांनाही त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हायकमांडने या मागणीकडे दुर्लक्ष करून जारकीहोळी यांना योग्य स्थान दिले नाही, तर आगामी काळात बेळगावहून ‘बेंगळुरू चलो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आयेशा सनदी यांनी दिला.
या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments