Belagavi

दि. सुरेश अंगडी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गणेश मंदिरात प्रार्थना

Share

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात असलेल्या श्री गणेश मंदिरात विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आली.

बेळगावमधील गणेश मंदिरात झालेल्या या अभिवादन व प्रार्थना सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. कर्नाटकच्या सर्वांगीण विकासात आणि या भागाच्या प्रगतीत सुरेश अंगडी यांनी दिलेल्या योगदानाचे या वेळी स्मरण करण्यात आले.

या प्रसंगी माजी खासदार मंगल अंगडी, खासदार जगदीष शेट्टर, राजन जाधव, अनूप काटे, ईरय्या खोत, हनुमंत कागलकर, चेतन अंगडी, संजय भंडारी, राहुल मुचंडी, विजय भद्र, नागराज पाटील, मुख्तार पठाण, सविता करडी, महावीर पाटील, राज पाटील यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: