Belagavi

नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची प्रभाकर कोरे यांनी घेतली भेट

Share

नूतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे डी. के. शिवकुमार यांचे बेळगावमधील केएलई काहेर आणि हुबळी तांत्रिक विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेंगळुरूमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

बेंगळुरूमध्ये डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. डी. के. शिवकुमार यांच्या कार्यकाळात कर्नाटक राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, अशा शुभेच्छा डॉ. प्रभाकर कोरे यांनी या वेळी दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान केएलई संस्थेचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी संचालक शंकर मुनवळ्ळी उपस्थित होते. त्यांनीही नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

Tags: