काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी किंवा आमदार गणेश हुक्केरी यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद द्यावे, या मागणीसाठी चिकोडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसवेश्वर चौकात मानवी साखळी निर्माण करून निदर्शने केली.

चिकोडीमधील शासकीय विश्रामगृहापासून सुरू झालेली ही पादयात्रा मुख्य रस्त्यांवरून बसवेश्वर चौकात पोहोचली. गेल्या ४० वर्षांपासून चिकोडी भागात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी हुक्केरी कुटुंबाचे योगदान मोठे असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस नेते रवी मिर्जे आणि अनिल पाटील यांनी सांगितले की, प्रकाश हुक्केरी यांनी गेल्या ४० वर्षांत पक्षाच्या चढ-उतारात नेहमीच निष्ठा राखली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी किंवा तरुण नेते गणेश हुक्केरी यांना तातडीने मंत्रीपद दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील आणि अनिल पाटील यांच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आले.
या आंदोलनात रणजित शिरशेट, अश्वथ शितोळे, मल्लिकार्जुन पाटील, किरण माळी, सुनील सप्तसागरे, रवी खोत, उमेश मठपती, अनिल माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments