तेलंगणा मधील निझामाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमात बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी बूथ पातळीवर पक्ष मजबूत करणे आणि काँग्रेस सरकारच्या धोरणांविरोधात लढा देण्याबाबत मार्गदर्शन केले.

तेलंगणा मधील निझामाबाद येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पक्ष तळागाळापासून म्हणजेच बूथ पातळीवरून संघटित करण्याबाबत आणि संघटनात्मक कामांबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. याच वेळी तेलंगणा मधील काँग्रेस सरकारच्या प्रशासकीय त्रुटी आणि धोरणांबाबत जनतेमध्ये जागृती करण्याचे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाला तेलंगणा मधील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




Recent Comments