बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही व्यक्तींकडून होणाऱ्या कथित त्रासाविरुद्ध आणि खोट्या आरोपांविरोधात एकत्र येत महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

मानसिक तणाव निर्माण करणाऱ्या घटकांविरुद्ध योग्य चौकशी करावी आणि निर्भयपणे काम वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी आज महापालिका आयुक्तांना सामूहिक निवेदन सादर केले.

बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही घटकांकडून आपल्यावर केले जात असलेले खोटे आरोप खोडून काढत आज आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली. महसूल वसुलीसोबतच निवडणूक कामकाज, जनगणना, अनधिकृत बॅनर हटवणे, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन यांसह वरिष्ठांनी सोपवलेली सर्व आव्हानात्मक कामे अहोरात्र प्रामाणिकपणे पार पाडत असतानाही, कार्यालयात उपस्थित नसतात असे निरर्थक आरोप लावले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या त्रासामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला असून मुक्तपणे काम करणे कठीण झाले आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


Recent Comments