Belagavi

एच. एन. शिरहट्टी यांनी स्वीकारला बेळगावच्या तहसीलदारपदाचा कार्यभार

Share

एच एन शिरहट्टी यांनी बेळगावचे नूतन तहसीलदार म्हणून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे.


बेळगावचे नूतन तहसीलदार म्हणून एच एन शिरहट्टी यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यापूर्वी बैलहोंगलमध्ये दोन वर्षे तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. तहसीलदार कार्यालयात आगमन होताच शिरस्तेदार आणि कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, प्रशासकीय कामकाजाला गती देत जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी कार्यालयातील मुख्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: