बेळगाव महसूल विभागात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाची बदली करण्यात आली आहे. बेळगावचे नूतन तहसीलदार म्हणून हणमंत शिरहट्टी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य सरकारने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.

बेळगावचे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले बसवराज नागराळ यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हणमंत शिरहट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन तहसीलदार हणमंत शिरहट्टी हे यापूर्वी बैलहोंगल तालुक्यात ग्रेड-१ तहसीलदार म्हणून कार्यरत होते. कर्नाटकच्या राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल विभागाने ही बदली प्रक्रिया राबवून तसा आदेश जारी केला आहे.



Recent Comments