Chikkodi

शमनेवाडीमध्ये १५० फूट उंच भगवान पार्श्वनाथ मूर्ती प्रतिष्ठापनेचा शुभारंभ

Share

चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडी गावात १५० फूट उंचीच्या भगवान पार्श्वनाथ मूर्ती प्रतिष्ठापनेच्या भूमी शुद्धीकरणाचा शुभारंभ आणि एजीएम कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. गुणधरनंदी मुनी महाराजांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते. याशिवाय आमदार शशिकला जोल्ले, अभय पाटील, दुर्योधन ऐहोळे यांच्यासह माजी आमदार पी. राजीव, अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ आणि महेश कुमठळ्ळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: