बेळगावमधील गणपत गल्ली येथील ऐतिहासिक सरकारी शाळेच्या नामफलकावर लावण्यात आलेले सार्वजनिक ‘पे टॉयलेट’चे बोर्ड स्थानिक तरुणांनी तत्परतेने हटवले आहे. शाळेचा अवमान करणारा हा फलक काढून त्याऐवजी कन्नड आणि मराठी भाषेतील नवीन नामफलक लावून तरुणांनी एक आदर्श घालून दिला आहे.

गणपत गल्ली मध्ये शहरातील अत्यंत जुनी ‘सरकारी मराठी मॉडेल शाळा क्रमांक २’ आहे. या शाळेच्या मुख्य नामफलकावरच सार्वजनिक पे टॉयलेटचे बोर्ड लावण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. ही बाब समजताच गणाचारी गल्ली येथील तरुणांनी विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली आणि तो वादग्रस्त फलक तातडीने काढून टाकला. त्यानंतर त्याच ठिकाणी दोन्ही भाषांमधील शाळेचा नवीन फलक सन्मानपूर्वक बसवण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणावर आणि त्यामागील पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. प्रशासकीय निष्काळजीपणामुळे ऐतिहासिक शाळेचा अवमान होत होता, मात्र तरुणांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया शंकर पाटील यांनी दिली. तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही शंकर पाटील यांनी स्पष्ट केले.


Recent Comments