Belagavi

हेस्कॉमचे एईई अश्विन शिंदे सेवानिवृत्त

Share

हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून बेळगावमधील केपीटीसीएल सभागृहात त्यांचा नागरी सत्कार करून निरोप देण्यात आला.


अश्विन शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवल्या असून ते अत्यंत साधे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचे अधिकारी आहेत. रात्रीच्या वेळीही वीज पुरवठ्याची समस्या भेडसावल्यास ते तातडीने मदतीला धावून जात असत. नागरिकांच्या भावना समजून घेऊन काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्याची सेवानिवृत्ती मनाला चटका लावणारी आहे. अधिकार हा जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तिथे अहंकाराला जागा नसावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अश्विन शिंदे आहेत, असे कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी म्हटले.


या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी उपस्थित होते. याशिवाय विशेष आमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका वैशाली एम. एल., संचालक एस. जगदीश आणि अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार चिकडे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Tags: