चिक्कोडी तालुक्यातील नेज क्रॉस येथे १५१ फूट उंचीच्या भगवान पार्श्वनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना, भूमी शुद्धीकरण, सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि एजेएम इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा सोहळा २४, २५ आणि २६ मे रोजी आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रसंत आचार्य १०८ गुणधरनंदी मुनिमहाराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


नेज क्रॉस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रसंत आचार्य १०८ गुणधरनंदी मुनिमहाराज यांनी सांगितले की, भारतात पहिल्यांदाच १५१ फूट उंचीची भगवान पार्श्वनाथांची भव्य मूर्ती गुणधर तीर्थ शमनेवाडी नेज क्रॉस येथे स्थापन केली जात आहे. २४ मे रोजी सकाळी अभिषेक, नित्य पूजा, दुपारी वास्तू विधी, संध्याकाळी आरती आणि प्रसिद्ध गायक चंदन शेट्टी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, माजी परिषद सदस्य वीरकुमार पाटील उपस्थित राहतील, असे राष्ट्रसंत आचार्य १०८ गुणधरनंदी मुनिमहाराज यांनी स्पष्ट केले.

तसेच २५ मे रोजी सकाळी अभिषेक, नित्य पूजा, भगवान पार्श्वनाथ विधी आणि सरस्वती मूर्ती शुद्धीकरण होईल. संध्याकाळी ७ वाजता पीयूसी प्राचार्यांचा सत्कार सोहळा आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक रघू दीक्षित यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, संपर्क मंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, बोरगावचे युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील आणि अण्णासाहेब हवले उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रसंत आचार्य १०८ गुणधरनंदी मुनिमहाराज यांनी सांगितले.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी, २६ मे रोजी सकाळी अभिषेक, नित्य पूजा आणि सकाळी ९ वाजता एजेएम इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन तसेच सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना होईल. या मुख्य समारंभाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रसंत आचार्य १०८ गुणधरनंदी मुनिमहाराज यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जयकुमार खोत, बाबण्णा खोत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments