विजापूर जिल्ह्यातील निडगुंदीमध्ये एका जुन्या घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


महादेवी वारद असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. निडगुंदी शहरातील गौरीश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या महादेवी या मध्यरात्री घरात गाढ झोपेत होत्या. त्याच वेळी घराचे छत अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने महादेवी यांचा जागीच श्वास गुदमरून मृत्यू झाला.


उकाडा जास्त असल्याने महादेवी यांचे पती शिवानंद हे रात्री घराबाहेर मोकळ्या जागेत झोपण्यासाठी गेले होते. यामुळे या भीषण दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद निडगुंदी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.


Recent Comments