बेळगावमधील अयोध्या नगर येथे गुरुपुष्यामृत योग दिनानिमित्त सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने पिंपळ, वड आणि बेल या वृक्षांच्या रोपांचे लावण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली हा पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यात आला.


या प्रसंगी बोलताना वीरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले की, या प्रकारच्या वनस्पती पर्यावरणात लावल्याने धार्मिक भावना आणि आर्थिक वृद्धी होण्यास मदत होते. ही झाडे प्रामुख्याने प्राणवायू देणारी म्हणून प्रसिद्ध असून, सुस्थिर विकास राखण्यात त्यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, असे मत वीरेश बसय्या हिरेमठ यांनी व्यक्त केले.


या उपक्रमावेळी फौंडेशनचे सदस्य सुभाष पाटील, गौरव भोसले, गौरीश हिरेमठ आणि गुरुराज हिरेमठ उपस्थित होते.


Recent Comments