इंधन बचतीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी एक आदर्श पायंडा घालून दिला असून, ते थेट इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

देशभरात यापूर्वी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी इंधन बचतीसाठी मेट्रो, सरकारी बस आणि सायकलचा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहे. याच धर्तीवर, विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी आपल्या भूतनाळ येथील निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत इलेक्ट्रिक बाईकने प्रवास करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

इंधन बचत ही आजच्या काळाची गरज असून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे खासदार रमेश जिगजिणगी यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन आणि ई-वाहनांचा वापर वाढणे आवश्यक आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी दिलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश प्रत्येकाने अंगीकारायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


Recent Comments