Belagavi

शिवम’ घोटाळ्याचा तपास वेगवान; नीलण्णावरची रवानगी बंगळुरूला करणार

Share

बेळगावमधील बहुकोटी आर्थिक घोटाळ्याचा तपास सीआयडीने वेगाने सुरू केला असून, मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला आज बेंगळुरूला हलवले जाण्याची शक्यता आहे.

काल रात्री उशिरापर्यंत सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली असून, हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे गूढ उकलण्यासाठी सीआयडी त्याला १४ दिवसांच्या कोठडीत घेण्याच्या तयारीती आहे.

बेळगावमधील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बेळगावमधील माळमारुती पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून, त्यांनी स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित गुंतवणूक आणि कर्ज व्यवहारांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत.

जनतेकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा करून त्या इतरत्र कर्ज स्वरूपात गुंतवल्याचे सत्य समोर आणण्यासाठी सीआयडीने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपी शिवानंद नीलण्णावर याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपासासाठी त्याची १४ दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी केली जाईल. न्यायालयाची परवानगी मिळताच, नीलण्णावरला आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी आजच बेंगळुरूला नेण्याची तयारी अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे.

Tags: