Vijayapura

चडचण तालुक्यात निसर्गाचा चमत्कार; दोन महिन्यांचे कोकरू देत आहे दूध

Share

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात असणाऱ्या जग्गजेवणी गावात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. येथील शेतकरी श्रीमंत दुंडप्पा होन्नामोरे यांच्या घरातील अवघ्या दोन महिन्यांचे कोकरू दूध देत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात असणाऱ्या जग्गजेवणी गावातील शेतकरी श्रीमंत दुंडप्पा होन्नामोरे यांच्या घरी दोन महिन्यांचे कोकरू दूध देत असून, ही घटना वैद्यकीय क्षेत्रासाठीही संशोधनाचा विषय ठरली आहे. ही अनोखी घटना पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने येत आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन कोकराची पाहणी केली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून हा प्रकार पाहण्यासाठी गावात लोकांची रिघ लागली आहे. आपल्या आयुष्यात अशी घटना कधीही पाहिली नसल्याची प्रतिक्रिया गावचे पुढारी सिद्धप्पा यांनी दिली.

Tags: