Belagavi

बेळगावमध्ये सुरेश यादव फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

बेळगावमधील रामतीर्थनगर येथे सुरेश यादव फाउंडेशनच्या वतीने दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले की, मुलांच्या शैक्षणिक यशाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक उत्तम उपक्रम असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागेल.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सोहळ्याला कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामीजींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: