Belagavi

लिंगायत संघटनेतर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Share

बेळगावमधील लिंगायत संघटनेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून सरकारी शाळेतील दहावीच्या गरीब विद्यार्थ्यांना ‘बसव ज्ञान केंद्र’ उपक्रमांतर्गत सर्व शैक्षणिक साहित्यासह मोफत शिक्षण देण्यात येत आहे.

या अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजू सेठ यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशीभूषण पाटील, तर ईरण्णा दयण्णावर यांनी अध्यक्षीय भाषण केले.

या कार्यक्रमाला शंकर कुंद्राळ, प्रवीण हुलजी, विद्या हुंडेकर, सुरेश खिराई, प्रसाद हिरेमठ, वीणा नागमोती आणि राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आनंद कर्की यांनी सूत्रसंचालन, तर शिवानंद नाईक यांनी आभार मानले.

Tags: