बेळगावमधील नामांकित केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा विज्ञान महाविद्यालयात तरुण पिढीला आपल्या मातीची संस्कृती, भाषा आणि वैभवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी ‘कन्नड जानपद वैभव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या निमित्ताने कॉलेजच्या आवारात एक भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामुळे संपूर्ण महाविद्यालयात ग्रामीण संस्कृतीचा रंग पाहायला मिळाला.


कार्यक्रमात बोलताना माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी देशातील विविधतेत एकता जपणारी श्रेष्ठ परंपरा विशद करत, लुप्त होत चाललेल्या लोककला आणि संस्कृतीच्या जतनासाठी असे उत्सव तरुण पिढीला प्रेरित करणारे ठरतात असे सांगून केएलई संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती कावळेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, आधुनिकतेच्या प्रभावामुळे मागे पडत चाललेल्या लोककलांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, याच उद्देशाने आर.एल.एस. कॉलेज आणि केएलई संस्थेच्या वतीने या विशेष लोककला विभागाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments