Belagavi

बेळगावमधील पाटील गल्लीत शनैश्वर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Share

बेळगावमधील पाटील गल्ली येथे श्री शनैश्वर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

या शिबिरामध्ये बेळगावमधील केएलई रुग्णालयाचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने रक्त संकलनाचे काम चोख पार पाडले. धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांमधून मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करण्यात आले असून याबद्दल आयोजक गजानन पाटील यांनी आभार मानले आहेत. तसेच, जयंती उत्सवाचा भाग म्हणून येत्या १९ मे रोजी मंगळवारी मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती गजानन पाटील यांनी दिली.

श्री शनैश्वर शैक्षणिक आणि समाज कल्याण संस्थेच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच असंख्य भाविक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून रक्तदान केले.

Tags: