Belagavi

श्रीनगरमधील उद्यान विकासाचा श्रीगणेशा लोकप्रतिनिधी आणि जनतेचा थेट संवाद

Share

बेळगावमधील श्रीनगर भागातील रहिवाशांसाठी लवकरच एक सुसज्ज उद्यान उपलब्ध होणार आहे. मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आज या उद्यानाच्या विकास कामांचा शुभारंभ केला असून, यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी आज श्रीनगर उद्यानातील विविध विकास कामांना अधिकृतपणे सुरुवात केली.

उद्यानाचे आधुनिकीकरण करून नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदारांनी उद्यानाच्या प्रस्तावित नकाशाची पाहणी केली आणि कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी उद्यानात उत्तम पथदिवे, आसन व्यवस्था, वृक्षारोपण आणि जॉगिंग ट्रॅकची आवश्यकता असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. जनतेच्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार करून लोकांच्या मागणीनुसारच हा प्रकल्प राबवला जाईल, असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी दिले.
यावेळी स्थानिक नेते, महानगरपालिकेचे अधिकारी आणि श्रीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या कामाचे रहिवाशांनी स्वागत केले आहे, अशी भावना श्रीनगरमधील नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: