Vijayapura

बसवन बागेवाडीत वानरसेनेचा उच्छाद मोबाईल टॉवरवर चढून माकडांचा धुमाकूळ

Share

विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी शहरात सध्या वानरसेनेने उच्छाद मांडला असून नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. शेकडो माकडांनी थेट मोबाईल टॉवरवर ताबा मिळवून ते हलवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बसवन बागेवाडी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मोबाईल टॉवरवर ही माकडे चढून सतत उड्या मारत आहेत. यामुळे टॉवर कमकुवत होऊन कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या माकडांच्या उपद्रवामुळे स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, लहान मुले आणि वृद्ध कमालीचे घाबरलेले आहेत.

शहरातील नागरिकांनी मंगळवारी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली. “माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ते आता मोबाईल टॉवरसारख्या उंच ठिकाणी जाऊन धोका निर्माण करत आहेत,” असे स्थानिकांनी सांगितले. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी या वानरसेनेचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी बसवन बागेवाडी येथील रहिवाशांनी केली आहे.

Tags: