Belagavi

बेळगावमधील मुचंडी गावात ग्रामदेवतांच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

Share

बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर श्री महालक्ष्मी आणि श्री मरगाई देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या थाटात सुरुवात झाली. ब्रह्ममुहूर्तावर पार पडलेल्या अक्षतारोपण सोहळ्याने संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात तब्बल 30 वर्षानंतर श्री महालक्ष्मी आणि श्री मरगाई ग्रामदेवतेच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे अक्षतारोपण पार पडल्यानंतर यात्रोत्सवाची सुरुवात झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या धार्मिक विधींनी गावच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंच कमिटीचे सदस्य आणि हक्कदारांनी शास्त्रोक्त पद्धतीने देवीची ओटी भरली. त्यानंतर मंदिराच्या परंपरेनुसार देवीला विशेष नैवेद्य अर्पण करण्यात आला.

आजपासून पुढील नऊ दिवस गावात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षतारोपणानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. या अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

Tags: