बेळगाव शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी महापालिकेने ‘गेल’ संस्थेसोबत करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली आहे.


गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पासाठी १० एकर जागा शोधण्याचे काम प्रगतीपथावर असून यामुळे शहरातील कचरा विल्हेवाटीची समस्या सुटण्यास मदत होईल. बेळगाव महापालिकेच्या ५८ वॉर्डांमधील निवासी क्षेत्र, बाजारपेठ आणि औद्योगिक वसाहतींमधून दररोज २१५ टन कचरा निर्माण होतो. या ओल्या कचऱ्याचा योग्य वापर करून गॅस तयार करण्यासाठी अंदाजे १०० कोटी रुपये खर्चून १५० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला जाणार आहे.


या प्रकल्पासाठी १० एकर जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांनी शहराच्या बाहेरील भागात जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, असे मनपा आयुक्तांनी यांनी सांगितले.


Recent Comments