Chikkodi

चिक्कोडीत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात भर उन्हात एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना व्यापारी गल्लीत घडली आहे. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले असून अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग विझवली.

विलास सालीमनी यांच्या मालकीच्या या दुकानात दरवाजा आणि खिडक्या तयार करण्याचे काम चालत असे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये दुकानातील मौल्यवान लाकूड आणि इतर साहित्य जळून भस्मसात झाले असून व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या दुकानांना मोठा धोका टळला.

Tags: