बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते एसएसएलसी परीक्षेत ९६ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी बिम्स रुग्णालयातील सोयीसुविधांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत त्यांनी लाभार्थ्यांना शिवणयंत्रांचे वाटप केले. तसेच मोरारजी देसाई निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रामतीर्थ नगरमधील अल्पसंख्याक विकास विभागाच्या कार्यालयात आयोजित समारंभात आमदार आसिफ सेठ यांनी सत्कार केला. याच कार्यक्रमात विविध योजनांतर्गत मंजूर झालेली शिवणयंत्रे लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि शिक्षकांचे योगदान मोठे असून त्यांनी सुशिक्षित होऊन समाजाची प्रगती साधावी. सरकारी शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. ‘बिम्स’मध्ये आरोग्य सुविधांसाठी २३.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे, असे आसिफ सेठ यांनी सांगितले. अल्पसंख्याक विद्यार्थिनींचे वसतिगृह, अब्दुल कलाम हायस्कूल आणि महाविद्यालयासाठी जागा व निधी मंजूर झाला असून ही कामे लवकरच सुरू होतील. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना वैयक्तिक फाउंडेशनतर्फे प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल, असे आश्वासन आसिफ सेठ यांनी दिले.

या प्रसंगी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अधिकारी एफ. यु. पुजारी, केएमडीसीचे अकबरसाब कुर्तकोटी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments