बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात भारत सरकारच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या संदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, शहराच्या प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची असून पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल.

बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज जनगणना प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. महापालिका व्याप्तीत एकूण ८३१ ब्लॉक्स निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक ब्लॉकमध्ये सुमारे २०० घरांची गणना केली जात आहे. या मोठ्या कामासाठी एकूण ७ चार्ज अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेले गणक कर्मचारी प्रत्येक घराला भेट देऊन रहिवाशांची सामान्य माहिती संकलित करतील.

सध्या घरांची यादी तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, येत्या १५ दिवसांत संपूर्ण जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नागरिकांनी गणक कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अशोक दुडगुंटी यांनी यावेळी केले.


Recent Comments