बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडस गावामध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ४.५० कोटी रुपयांच्या ‘ब्रिज कम बॅरेज’ कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या ब्रिज कम बॅरेजमुळे केवळ वाहतुकीची सोय होणार नाही, तर पाणी साठवणुकीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

बडस गावातील ग्रामस्थांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचे स्वागत केले असून, यामुळे शेती आणि दैनंदिन दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याची भावना व्यक्त केली.
या सोहळ्याला ‘काडा’ अध्यक्ष युवराज कदम, मनोहर बेळगावकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments