Belagavi

बेळगाव: जनता बारमध्ये भरदिवसा वेटरवर प्राणघातक हल्ला

Share

बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खडे बाजार येथील जनता बारमध्ये एका वेटरवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात असलेल्या जनता बारमध्ये काल रात्री उशिरा ही घटना घडली. बार वेटर संतोष धनवडे (वय ३०) याच्यावर काही इसमांनी शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Tags: