Belagavi

दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या रिक्षाचालकाच्या मुलाचा सत्कार

Share

बेळगावमधील रिक्षाचालकाच्या मुलाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत चिकाटीने अभ्यास करून दहावी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीएम महांतेश धामण्णवर आणि बबन भोबे मित्रमंडळाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

बेळगावमधील गवळी गल्ली येथील रिक्षाचालकाचा मुलगा शिवराज सिद्धेश्वर गवळी याने दहावीच्या परीक्षेत ९८.१२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्याच्या यशाची दखल घेत त्याला प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी शिवराजच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले.

या प्रसंगी पीएसआय आनंद आदगोंडा, पीएसआय उद्धप्पा कट्टीकर, हेड कॉन्स्टेबल शेट्टी, राजू केणी, मारुती देसूरकर आणि बबन भोबे उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या या गौरवमुळे विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

Tags: