Vijayapura

विजापूरमध्ये एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Share

विजापूर जिल्ह्यातील कोल्हार शहराबाहेर रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग २१८ वरील गाणदेवी सर्कलजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अनर्थ घडला.

विजापूर येथील रहिवासी असलेला आकाश भीमप्पा बबलेश्वर उर्फ बंडीवड्डर (२६) असे मृताचे नाव आहे. एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत आकाश याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वाढत्या वेगावर मर्यादा नसल्याने आणि सर्कलजवळ आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने हे अपघात घडत असल्याची टीका स्थानिकांनी केली. या प्रकरणी कोल्हार पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: