Belagavi

अंतर्गत आरक्षणावरून भाजपला राजकीय पोटशूळ : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

राज्यातील अंतर्गत आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. काँग्रेसने दिलेला शब्द पूर्ण केला असून, भाजपला हा निर्णय पचवणे कठीण जात असल्याची टीका मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

अंतर्गत आरक्षणाच्या निर्णयाला सर्व समाजघटकांचा आणि संघटनांचा पाठिंबा आहे. या विधायक निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी भाजप केवळ विरोधासाठी विरोध करत आहे, असे सतीश जารकीहोळी यांनी म्हटले.

काँग्रेसने अत्यंत मुत्सद्दीपणे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे आता भाजपला टीका करण्यासाठी नवे मुद्दे शोधावे लागत आहेत, असा टोला सतीश जारकीहोळी यांनी लगावला.

काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर हायकमांड योग्य वेळी निर्णय घेईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबतचा पेच लवकरच सुटेल, असे सूचक वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले.

पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांनी सत्तेत वाटा मागण्यात काहीच गैर नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.

Tags: