बेळगावमधील केएलई व्ही. के. दंत विज्ञान संस्थेमध्ये ‘परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम’ या संकल्पनेवर आधारित २८ व्या राष्ट्रीय स्तरावरील दंत वैद्यकीय परिषदेला आज शानदार सुरुवात झाली.


बेळगावमधील जेएनएमसी कॅम्पसच्या केएलई शताब्दी संमेलन केंद्रात कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना डॉ. एम. सी. सुधाकर यांनी आवाहन केले की, दंत वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक बदलांचा डॉक्टरांनी स्वीकार करून संशोधनावर अधिक भर द्यावा.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून २३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी आयपीएसचे अध्यक्ष डॉ. व्ही. आनंद कुमार आणि सचिव डॉ. जंगाल हरी यांच्यासह दंत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ‘आयपीएस टाइम्स’ पत्रिका आणि स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. केएएचईआरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेच्या शैक्षणिक कार्याची आणि दंत वैद्यकीय सेवेची माहिती दिली.
परिषेदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. आनंदकुमार पाटील यांनी स्वागत केले, तर संघटक सचिव डॉ. रमेश नायक यांनी आभार मानले. दंत वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक उपचारांवर या परिषदेत विशेष चर्चा करण्यात येत आहे.


Recent Comments