बेळगावमधील मुजावर गल्लीतील रस्ते आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांना उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी प्रारंभ केला.


मुजावर गल्ली भागातील रस्ते, गटारी आणि इतर विकासकामांचे भूमिपूजन आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका वैशाली भातकांडे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


या परिसरात सुमारे ४० वर्षांपूर्वी भूमिगत गटारींचे काम झाले होते, मात्र त्यानंतर दुरुस्ती न झाल्याने ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत होते. या समस्येची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून आता नवीन गटारी आणि रस्ते बांधले जाणार आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील आणि नागरिकांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने पुढील विकासकामे हाती घेतली जातील, असे आसिफ सेठ यांनी सांगितले.
यावेळी कंत्राटदार नरसन्नवर, स्थानिक पंच मंडळाचे प्रतिनिधी, जमातचे सदस्य आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments