Belagavi

घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट

Share

उत्तर कर्नाटकातील जनतेची जीवनवाहिनी समजली जाणारी घटप्रभा नदी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटू लागली आहे. यामुळे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील हजारो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महारष्ट्रातील पश्चिम घाटात उगम पावून सुमारे २८३ किलोमीटरचा प्रवास करत कृष्णा नदीला मिळणारी घटप्रभा नदी सध्या कोरडी पडू लागली आहे. बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील हजारो गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा हा मुख्य आधार असून, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नदीचे पात्र आटत असल्याने हजारो शेतकरी कुटुंबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हिडकली धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता परिस्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. ५१ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात १९.५३८ टीएमसी पाणीसाठा होता, जो यंदा केवळ १७.५९१ टीएमसीवर आला आहे. यामध्ये २ टीएमसी पाणी ‘डेड स्टोरेज’ असल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलस्त्रोत आटत आहेत, ज्याचा मोठा फटका पशुधनासह मानवी वापराच्या पाणीपुरवठ्याला बसण्याची शक्यता आहे.

Tags: