बेळगावमधील केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात सोमवारी कन्नड संघ या विद्यार्थी गटाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी कन्नड भाषेचा इतिहास आणि विधी क्षेत्रात या भाषेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.


कन्नड ही केवळ भाषा नसून प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे आणि विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना या भाषेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन महांतेशनगर शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला बट्टल यांनी केले.

विद्यार्थ्यांनी गौरवशाली इतिहास असलेल्या कन्नड भाषेचा सन्मान राखत तिच्या विकासासाठी महाविद्यालयात निरंतर उपक्रम राबवावेत, तसेच कन्नड भाषेतून विधीविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे, असे आवाहन डॉ. ए. एच. हवालदार यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्वयक आणि कन्नड संघ विभागाचे अध्यक्ष प्रा. चेतनकुमार टी. एम. यांनी विजेत्यांना बक्षिसे आणि बॅजेसचे वाटप केले. यावेळी यल्लाप्पा बामनहळ्ळी, संजना इटगी, स्नेहा मेत्री, सिद्धलिंग कवटकर, अजय बोम्मन्नावर, सुचित्रा शिंगे यांच्यासह कन्नड संघाचे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी आणि सदस्य उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या कन्नड संघ विभागाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी उपस्थिती दर्शवली होती.


Recent Comments