Belagavi

बोगस जात प्रमाणपत्रांविरुद्ध वाल्मिकी समाजाचा एल्गार

Share

अनुसूचित जमातीच्या नावाने काढल्या जाणाऱ्या बोगस जात प्रमाणपत्रांच्या विरोधात आज बेळगावात उत्तर कर्नाटक प्रदेश वाल्मिकी नायक समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले.

बोगस प्रमाणपत्रे मिळवून अनेकजण वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय पदांचा अवैध लाभ घेत आहेत, ज्यामुळे समाजातील पात्र उमेदवार संधीपासून वंचित राहत आहेत. समाजाच्या आमदारांनी यावर मौन न बाळगता सभागृहात आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

समाजाच्या आरक्षणात कपात करून नवीन कायदे लागू करण्याच्या सरकारच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्हाला घटनादत्त आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा एका आंदोलकाने दिला.

यावेळी मोठ्या संख्येने वाल्मिकी समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: