Vijayapura

इंडीत रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक उघड

Share

विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर अन्न निरीक्षक आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली. या कारवाईत लाखो रुपयांचा तांदूळ जप्त करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात रेशनच्या तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच अन्न निरीक्षक आणि पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत १.१९ लाख रुपये किमतीचा सुमारे ४२७० किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी ‘एमएच १३ एए ३७४५’ या क्रमांकाचे वाहन घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांची चाहूल लागताच वाहनाचा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी इंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला तांदूळ आणि वाहन मिळून एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Tags: