
रयबाग तालुक्यातील सुक्षेत्र चिंचली मायाक्का देवीच्या जत्रोत्सवानिमित्त बंडीगणी मठाच्या वतीने भाविकांसाठी पंचपक्वान्न भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही चिंचली मायाक्का देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील बंडीगणी येथील बसवगोपाल नीलमाणिक मठाचे चक्रवर्ती अन्नदानेश्वर श्री यांच्या आशीर्वादाने महादासोहाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादामध्ये हुग्गी, जिलेबी, भजी, पांढरा भात, मसाला भात, सांबार आणि वांग्याची भाजी यासह विविध चविष्ट पदार्थांचा समावेश होता. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी चिंचली मायाक्का देवी मंदिर समितीचे अध्यक्ष जितेंद्र रा. जाधव देसाई चिंचलीकर यांनी दासोह स्थळाला भेट दिली. चक्रवर्ती दानेश्वर श्री आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या दैवी शक्तीमुळे आणि आशीर्वादाने हा अन्नदानाचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे, हीच त्यांच्या सामर्थ्याची पावती आहे, अशी भावना जितेंद्र रा. जाधव देसाई चिंचलीकर यांनी व्यक्त केली.

त्यानंतर बावलत्ती येथील श्रींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चक्रवर्ती दानेश्वर श्री सदैव आपल्या पाठीशी आहेत. त्यांचे ध्यान आणि स्मरण केल्यास ते भक्तांना कधीही अंतर देणार नाहीत, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या चरणी लीन राहावे.
बंडीगणी येथील बसवगोपाल नीलमाणिक मठाचे भक्त शिवू यांनी माहिती दिली की, चक्रवर्ती अन्नदानेश्वर श्रींच्या आशीर्वादाने मायाक्का देवीच्या जत्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांच्या सहकार्याने हा सेवायज्ञ असाच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया शिवू यांनी दिली.


Recent Comments